Monday , September 21 2026
Breaking News

15 जूनला कन्नडसक्तीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Spread the love

 

बेळगाव : कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना येत्या 1 जून रोजी अभिवादन करण्याबरोबरच नामफलकांवरील कन्नड सक्तीच्या विरोधात 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे शनिवारी दुपारी पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किनेकर होते. बैठकीत 1 जून रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमासह व्यावसायिक नामफलकांवरील मराठी व इंग्रजी हटवून कन्नड भाषेची सक्ती केली जात असल्याच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी कन्नड सक्तीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चामध्ये मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर यांनी सांगितले की, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात आली. येत्या 1 जून 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता हिंडलगा येथे एकत्र जमून कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नामफलकांवर 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के मराठी अथवा इतर भाषा असाव्यात असा कायदा असताना त्याची अंमलबजावणी सरकारी कार्यालयांमध्ये होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच बेळगाव शहरात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी नामफलक हटविण्याचे प्रकार सुरू असल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या सर्व घटनांच्या निषेधार्थ येत्या 15 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती मनोहर किनेकर यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *