Monday , September 21 2026
Breaking News

हास्य विनोदाला जीवनात महत्वाचे स्थान : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड

Spread the love

 

बेळगाव : हास्य विनोदाला जीवनात महत्वाचे स्थान असल्याने नेहमी हसत रहा असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी दिला.
बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘व्यस्त जीवन आणि रंजन’ या विषयावर बोलत होते. डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ, टिळकवाडी येथे कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. गायकवाड यांनी वय हे नंबर असून त्याकडे गांभिर्याने न पाहता जीवनाचा आनंद घ्या तर नव्वदीनंतरच खऱ्या अर्थाने म्हातारपण येते असे सांगून कोणी सल्ला विचारला तरच सल्ला द्या असा कानमंत्रही उपस्थितांना दिला.

यावेळी अश्विनी पाटील, डॉ.श्रेयश चौगुले, रविंद्रनाथ जुवळी, जगमोहन अगरवाल, योगिनी व सुरेन्द्र देसाई, अशोक कदम यांनी हिंदी, मराठी, कन्नड गीते सादर केली. विजय बांदिवडेकर यांनी शास्त्रीय गीत तर चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता सादर केली. वनिता जोशी यांनी अधिक मासांचे महत्त्व सांगितले. प्रारंभी पांडुरंग कारकल यांनी प्रार्थना सादर केली.
सुरेन्द्र देसाई यांनी प्रास्ताविक केले तर शिवराज पाटील यानी पाहुण्यांची ओळख करून दिली. मीना कुलकर्णी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *