Monday , September 21 2026
Breaking News

महापालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाटाळ नागराज यांच्यासह अनेक कन्नड समर्थक कार्यकर्ते ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी विविध कन्नड समर्थक संघटनांनी आज महापालिकेवर घेराव घालण्यासाठी आंदोलन छेडले असता पोलिसांनी वाटाळ नागराज यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात अनेक कन्नड संघटनांचे समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आलेल्या आंदोलन काढण्यात आला.

२००४ मध्ये बेळगाव महानगरपालिकेत महाराष्ट्राच्या बाजूने ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली होती. मात्र, ही मागणी पूर्ण न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात करताच काही आंदोलनकर्त्यांनी आरटीओ सर्कल परिसरात रस्त्यावर बसून तसेच झोपून निषेध आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *