Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव महापालिकेला २ जूनपर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा ‘कर्नाटक बंद’चा इशारा : वाटाळ नागराज

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे तसेच महाजन आयोग अहवालाच्या अंमलबजावणीचा ठराव २ जूनपर्यंत बेळगाव महानगरपालिकेत मंजूर करावा, अन्यथा ४ जून रोजी बंगळुरूत बैठक घेऊन अखंड कर्नाटक बंदची हाक दिली जाईल, असा इशारा ज्येष्ठ कन्नड चळवळीचे नेते वाटाळ नागराज यांनी दिला.

बेळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना वाटाळ नागराज म्हणाले की, “महानगरपालिका कोणत्या भूमीवर आहे, हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. बेळगाव ही कन्नड भाषिकांची भूमी असून ते कर्नाटकचे अविभाज्य भाग आहे. महाजन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत ठराव मंजूर झाला पाहिजे.”

ते पुढे म्हणाले की, “आजपासून एका आठवड्याच्या आत याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा ४ जून रोजी बंगळुरूत विविध कन्नड संघटनांची बैठक घेण्यात येईल. प्रविण शेट्टी, शिवरामेगौडा, नारायणगौडा यांच्यासह विविध कन्नड संघटनांच्या नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येणार असून त्यानंतर अखंड कर्नाटक बंदची घोषणा केली जाईल.”

वाटाळ नागराज यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. “बंदच्या दिवशी आम्ही बेळगावात येऊ आणि येथून मोठ्या चळवळीची सुरुवात होईल,” असे ते म्हणाले. तसेच राज्य सरकारने या विषयात हस्तक्षेप करावा आणि बेळगाव हे कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव मंजूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *