Tuesday , May 26 2026
Breaking News

रायबाग तालुक्यात भीषण अपघात होऊन चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोम्मनल गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महंतेश, त्यांची पत्नी साक्षी आणि त्यांचे ९ महिन्यांचे बाळ हे तिघे दुचाकीवरून रायबाग रेल्वे स्थानक परिसरातून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची एका ऑटोरिक्षासोबत जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की महंतेश, साक्षी आणि त्यांच्या चिमुकल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव महापालिकेला आज कन्नड संघटनांचा घेराव; बेळगावातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *