Sunday , September 20 2026
Breaking News

कायद्याच्या चौकटीत बकरी ईद साजरा करण्याचे निपाणी पोलीस उपनिरीक्षकांचे आवाहन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कायदा व नियमाच्या चौकटीत बकरी ईद सणाचे महत्त्व जोपासून हा सण शांततेत साजरा करा. हिंदू मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा जोपासावा, असे आवाहन पोलीस उप निरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी केले. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते.
निपाणी परिसरात अनेक सण उत्सव हिंदू-मुस्लिम बांधवांच्यावतीने शांततेत साजरे केले जातात. वर्षागणीक साजरा होणाऱ्या सणांना अनेक अर्थानी महत्त्व आहे. या सणाचे महत्त्व सर्वांनीच अबाधित राखावे. मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण बुधवारी (ता. २७) साजरा होणार आहे. त्यामुळे हा सण मुस्लिम बांधवांनी शांततेने साजरा करावा. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही सहकार्य मिळेल, असेही काजोळ यांनी सांगितले.
यावेळी शांतता कमिटीतील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना काजोल यांनी उत्तरे देण्यात आली.
बैठकीस हाफिज अलीम हुसेन, माजी सभापती जुबेर बागवान, माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, बक्तीयार कोल्हापुरे, मैनुद्दीन मुल्ला, अनिस मुल्ला, शरीफ बेपारी यांच्यासह हिंदू -मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *