Monday , September 21 2026
Breaking News

पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात उद्यमबाग पोलीस स्थानकात तक्रार

Spread the love

 

बेळगाव : पोक्सो प्रकरणात साक्ष देऊ नये म्हणून साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात उद्यमबाग
पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संजय परशुराम नेकनार (वय ३६, रा. शांतीसागर कॉलनी, मजगाव, बेळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पिरनवाडी क्रॉस परिसरात ‘परशुराम किचन वेअर’ नावाचे भांडी दुकान असून ते आपल्या भावासोबत व्यवसाय करतात.
तक्रारदार संजय नेकनार हे मार्केट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ६१/२०२६ या पोक्सो प्रकरणातील साक्षीदार आहेत. या प्रकरणात आरोपी सागर बाळू भोसले याच्याविरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास सागर भोसले याचे नातेवाईक म्हणून ओळख असलेले रोहित विठ्ठल गणाचारी आणि रवी वाकोडे हे दोघे पिरनवाडी येथील दुकानात आले. त्यावेळी दुकानात संजय यांचा भाऊ अनिल नेकनार आणि कामगार उपस्थित होते. दोघांनी दुकानात घुसून “संजय कुठे आहे?” अशी विचारणा केली. संजय बाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी अनिल नेकनार यांना धमकावत, “जर संजयने न्यायालयात सागर भोसले यांच्या विरोधात साक्ष दिली तर त्याला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दोघांनी शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली आणि जाताना अनिल यांचा मोबाईल फोन घेऊन गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी पोलिसांकडे केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *