Wednesday , June 3 2026
Breaking News

कागवाडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

Spread the love

 

कागवाड : कागवाड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पहिली घटना कागवाड-शेडबाळ मार्गावरील उप्पारवाडी गावाजवळ घडली. शेडबाळहून कागवाडकडे जात असलेल्या दुचाकीची समोरच्या दिशेने जात असलेल्या मारुती स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात महाराष्ट्रातील मिरज तालुक्यातील सावळी येथील महानंदा सचिन चौगुले (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक व त्यांचे पती सचिन चौगुले (वय ४४) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसरी घटना मिरज-चिकोडी मार्गावरील शिरगुप्पी गावाजवळ घडली. येथे दुचाकीस्वार विठ्ठल बसप्पा अक्कीमरडी (वय ५०, रा. निडगुंदी, ता. रायबाग) यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन्ही अपघात कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) जे. ए. सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी कागवाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात

Spread the love  बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *