Friday , August 21 2026
Breaking News

सार्व. वाचनालयातर्फे साने गुरुजी यांचा 76 वा स्मृतिदिन गांभीर्याने

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे आज गुरुवारी साने गुरुजी यांचा 76 वा स्मृतिदिन गांभीर्याने आचरणात आणण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य अभय याळगी व प्राध्यापक विनोद गायकवाड यांनी साने गुरुजींबद्दल थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमास वाचनालयाचे उपाध्यक्ष रघुनाथ बांडगी, कार्यवाह लता पाटील, सहकार्यवाह प्रसन्न हेरेकर, सदस्य ॲड. आय. जी. मुचंडी सुनीता मोहिते विशाल राऊत अर्जुन गावडे आदींसह वाचनालयाचे सदस्य व हितचिंतक उपस्थित होते. कार्यवाह लता पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *