Saturday , August 22 2026
Breaking News

सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी सावध राहा; जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : सोशल मीडियाचा गैरवापर करून प्रक्षोभक मजकूर, धमकीचे व्हिडिओ किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष सायबर सेलची स्थापना केली आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

सायबर सेलची विशेष टीम सोशल मीडियावरील प्रक्षोभक पोस्ट, द्वेषपूर्ण संदेश तसेच ऑनलाइन माध्यमातून धमकीचे संवाद प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर सतत लक्ष ठेवून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशयास्पद स्टेटस, व्हायरल व्हिडिओ आणि इतर ऑनलाइन हालचालींचा मागोवा घेणे पोलिसांना शक्य होत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.

हा सायबर सेल चोवीस तास कार्यरत राहणार असून, सोशल मीडियावरील गैरप्रकारांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन केले आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारेही संबंधित प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, केवळ आक्षेपार्ह किंवा खोटी पोस्ट तयार करणाऱ्यांवरच नव्हे, तर अफवा, फेक न्यूज किंवा द्वेषपूर्ण मजकूर पुढे पाठविणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक रामराजन यांनी दिला आहे.

सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा आणि कोणतीही माहिती पडताळणी केल्याशिवाय शेअर करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *