Saturday , August 22 2026
Breaking News

कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांचे काव्यवाचन शनिवारी

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने राबविण्यात येत असलेल्या “कवी समजून घेताना” या उपक्रमांतर्गत शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावतर्फे सातवे पुष्प म्हणून ‘स्वरूपायन’ या विशेष काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन या कार्यक्रमात करण्यात येणार असून हा साहित्यिक सोहळा शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सरस्वती वाचनालय, कोरे गल्ली, बेळगाव येथे संपन्न होणार आहे.

प्रा. स्वरूपा इनामदार या शब्दगंध कवी मंडळ संघाच्या ज्येष्ठ सदस्या असून सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा म्हणून साहित्य, वाचनसंस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्या कवितांमधून मानवी भावना, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा, नातेसंबंध आणि जीवनमूल्यांचे संवेदनशील व प्रभावी चित्रण अनुभवायला मिळते. त्यामुळे त्यांच्या काव्यविश्वाचा जवळून परिचय करून घेण्याची ही रसिकांसाठी एक अनोखी संधी ठरणार आहे.

कार्यक्रमानंतर उपस्थित कवींसाठी खुल्या व्यासपीठावरील कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात स्थानिक तसेच नवोदित कवींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. परिणामी हा उपक्रम केवळ काव्यवाचनापुरता मर्यादित न राहता प्रस्थापित आणि नवोदित कवींमधील साहित्यिक संवादाचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.

शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी आणि सचिव सुधाकर गावडे यांनी सर्व साहित्यप्रेमी, कवी, विद्यार्थी, वाचक व रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्यिक मेळाव्याची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *