Monday , August 17 2026
Breaking News

दहावीत उत्तीर्ण करण्याचे आमिष; विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाचा शिक्षकावर आरोप, चिक्कोडीत खळबळ

Spread the love

 

चिक्कोडी : पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आल्याचा आरोप समोर आला आहे. येथील एका सरकारी उर्दू हायस्कूलमधील कन्नड विषयाच्या शिक्षकावर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवत लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाने दहावीतील पाचहून अधिक विद्यार्थ्यांना कन्नड विषयात पास करून देण्याचे आश्वासन देत त्यांना शाळेतील खोली तसेच शौचालय परिसरात नेऊन गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती पालकांना मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या काही पालकांनी संबंधित शिक्षकाला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.
श्रीशैल कुंभार असे आरोप असलेल्या शिक्षकाचे नाव असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाबाबत तक्रारी होत असल्याचे समजते. या घटनेमुळे शाळेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नागरिकांकडून शिक्षकाला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच संबंधित शिक्षकाला जमावाच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, आपल्यावरील आरोपांबाबत संबंधित शिक्षकाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. या प्रकरणाची चिक्कोडी पोलीस सखोल चौकशी करीत असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *