Wednesday , June 17 2026
Breaking News

कन्नडसक्ती मोर्चाची जनजागृती उद्या “या” भागात होणार

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दिनांक २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी निघणाऱ्या या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी उद्या बुधवार दिनांक १७ जून (बुधवार) रोजी जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली आहे.

या जनजागृती फेरीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज गार्डन येथून सुरू होणार असून पुढील मार्गाने फेरी काढण्यात येणार आहे:

मठ गल्ली, बसवान गल्ली, होसूर, महात्मा फुले रोड, मिरापूर गल्ली, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, जेड गल्ली, आळवाण गल्ली, आनंदवाडी, कंकणवाडी कॉलेज परिसर, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, गाडे मार्ग, बसवान गल्ली (शहापूर), खडेबाजार (शहापूर), सराफ गल्ली (शहापूर), आचार्य गल्ली (शाहापूर), नार्वेकर गल्ली (शहापूर), विठ्ठल देव मंदिर मार्गे खडेबाजार ते नाथ पै सर्कल येथे फेरीचा समारोप होईल.

मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमान जपण्यासाठी प्रत्येक मराठी बांधवाने या जनजागृती फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कन्नडसक्ती विरोधी मोर्चाला युवा समिती सीमाभागचा पाठिंबा

Spread the love  शुभम शेळके यांच्यावरील पोलिसी कारवाईचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *