Friday , June 19 2026
Breaking News

व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी येथे जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने विद्यार्थिनींना गणवेश वितरण

Spread the love

 

बेळगाव : विश्व भारत सेवा संचलित व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी शाळेत जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने विद्यार्थिनींना गणवेश वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.बी.एस.एस संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगावचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण शिंदे, संजय पाटील, शिवराज पाटील, माजी अध्यक्ष, मधु बेळगावकर, अरुण काळे, दिलीप सोहनी, मुकुंद महागावकर, वाय.एन. पाटील, राहुल बेलवलकर, ईश्वर पाटील, दुर्गेश हरिते, श्रीशैल मालशेट्टी संचालक मंडळ जेंट्स ग्रुप ऑफ बेळगाव, एम वाय पाटील मुख्याध्यापक बेळगुंदी हायस्कूल, कलाप्पा कुनुरकर हे उपस्थित होते. इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या पंचवीस मुलींना दिलीप सोहनी यांच्या वतीने शाळेचा गणवेश वितरण करण्यात आला. यावेळी लक्ष्मण शिंदे यांनी जायन्ट्स ग्रुपचे महत्व व कार्य याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी यांनी जायन्ट्स ग्रुपच्या कार्याबद्दल प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम वाय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन के डी पाटील व आभार प्रदर्शन विद्या फाळके यांनी केले यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप-हिडकल जलाशयातील पाणीसाठा तळाला; बेळगाववर भीषण पाणीसंकटाचे गडद सावट

Spread the love  बेळगाव : “पाणी जपून वापरा…” हा सल्ला आता केवळ प्रशासनाचे आवाहन राहिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *