
येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मशाल मिरवणूक काढून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीवतीने सोमवार दि. 22 जून रोजी कन्नड सक्ती विरोधात महामोर्चाची जनजागृती करण्यात आली. प्रारंभी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी, मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने असंविधानिक अत्याचार केले आहेत. कायद्यानुसार कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेलाही घटनात्मक हक्क मिळावेत. अन्यथा मराठी भाषिक कदापी स्वस्थ बसणार नाहीत, असे सांगितले.
मशाल मिरवणूकीची सुरुवात येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष वामन पाटील, समितीचे नेते रमाकांत दादा कोडूसकर, रणजित चव्हाण, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, दौलत कुगजी आदि मान्यवरांच्या हस्ते मशाली पेटवून करण्यात आली
यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकिसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मशाल मिरवणूक शिवसेना चौकातून प्रमुख मार्गावरून फिरुन महाराष्ट्र चौकात विसर्जित करण्यात आली.
कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, अॅड. अमर येळ्ळूरकर, राजू पावले, दत्ता उघाडे, नागेंद्र पाखरे, महेश जुवेकर, शेखर पाटील, सुहास हुद्दार, उमेश पाटील, राजू मरवे, प्रा. आनंद आपटेकर, सुनील बाळकुंद्री, सागर पाटील, चांगदेव परीट, नागेश बोबाटे, शिवाजी सायनेकर, दयानंद उघाडे, सुरज गोरल, गणेश अष्टेकर, सतीश शि. पाटील, श्रीकांत नांदुरकर, प्रकाश पाटील, प्रकाश मालुचे, अनिल हुंदरे, नेताजी गोरल, शिवाजी कदम, यल्लुप्पा पाटील, सतीश देसूरकर, रमेश पाटील, शुभम जाधव, अनिल पाटील, नंदकुमार पाटील, कृष्णा शहापूरकर, राकेश परीट, दौलत पाटील, कृष्णा बिजगरकर, रमेश धामणेकर, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta