Tuesday , August 18 2026
Breaking News

…ही कोल्हेकुई वेळीच थांबवा; येळ्ळूर म. ए. समितीचा इशारा

Spread the love

 

येळ्ळूर : गेली 70 वर्षे लोकशाही मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समिती आपला लढा प्राणपणाने लढत असताना त्याला गालबोट लावण्याचे लांछनास्पद काम कन्नड संघटना सातत्याने करत आहेत. त्यामुळेच सीमाभागातील वातावरण कलुषित होत आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने शांततेच्या मार्गाने निवेदन दिल्यानंतर मराठी माणसांना डिवचण्याचे काम करण्यात आले आहे. त्यांना प्रशासन खतपाणी घालत आहे. या उपद्रवी संघटनांना वेळीच आवरा, अन्यथा मराठी माणूस योग्य तो बंदोबस्त करील, असा सज्जड इशारा येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर म. ए. समितीचे अध्यक्ष वामन पाटील हे होते.
प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, दुद्दापा बागेवाडी व नागेश बोराटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीस प्रकाश पाटील, सुरज गोरल, दयानंद उघाडे, सतीश शिवाजी पाटील, नेताजी गोरल, कृष्णा शहापूरकर, यलुप्पा पाटील, बाळकृष्ण पाटील, कृष्णा बिजगरकर, राकेश परीट, भोला पाखरे, प्रदीप देसाई, सतिश कुगजी, रमेश धामणेकर, नंदकुमार पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री वरद सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : भक्तांच्या नवसाला पावणारा व सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *