Tuesday , August 18 2026
Breaking News

दि. सह्याद्री मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूल, वाघवडे शाळेमध्ये मंगळवार दिनांक 23- 06 -2026 रोजी दि. सह्याद्री मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सह्याद्री सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. किरण पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. माननीय प्राचार्य अनंत पाटील सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. किरण पाटील, प्रा. एम बी निर्मळकर, प्राचार्य आनंद पाटील, श्री. भास्कर ताशीलदार, इमारत बांधकाम कमिटीचे अध्यक्ष व शाळा सुधारणा समितीचे सदस्य माजी मुख्याध्यापक श्री. आर. के. पाटील, श्री. दीपक आंबोळकर, श्री. एम. टी. आंबोळकर, श्री. गावडू पाटील या मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा बांधकाम कमिटीचे सर्व सदस्य शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ बालक पालक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोर पाटील सरांनी केले व आभार ए. एम. साबळे सरांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री वरद सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : भक्तांच्या नवसाला पावणारा व सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *