Tuesday , August 18 2026
Breaking News

शिवाजीनगर अपघातातील जखमी सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती दळवी यांचे निधन; मणतुर्गा येथे आज अंत्यसंस्कार

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवार (दि. २३ जून २०२६) रोजी रात्री ८ वाजता मूळ गावी मणतुर्गा (ता. खानापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

सोमवारी दि. २२ जून रोजी शिवाजीनगर परिसरात झालेल्या अपघातात भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीस्वाराने दळवी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

मारुती दळवी यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी तसेच भाऊ-बहिणी असा परिवार आहे. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांचे धाकटे बंधू होते.

त्यांच्या निधनामुळे मणतुर्गा गावासह परिसरात शोककळा पसरली असून विविध सामाजिक व राजकीय स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कचऱ्याच्या वादातून थरार; खानापूर तालुक्यातील हेब्बाळच्या दाम्पत्यावर सांगलीत हल्ला, पत्नीचा मृत्यू

Spread the love  खानापूर : कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *