Tuesday , August 18 2026
Breaking News

‘मराठी भाषा प्रेरणा मंच’तर्फे मराठी विद्यानिकेतनला महात्मा जोतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित

Spread the love

 

बेळगाव : सन् 2025-26 मध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सर्व क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद प्रगती केल्याबद्दल शाळेला मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्यावतीने “महात्मा जोतिबा फुले पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे वेणुग्रामचे अध्यक्ष शशिकांत नाईक, प्रमुख वक्ते रणजीत चौगुले, प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉ.गोपाळ पाटील, उपाध्यक्ष डी.बी. पाटील, सेक्रेटरी अरूण कदम, निवृत्त शिक्षक आर.के. पाटील, सुरेश पाटील, शिवाजी हसनेकर, मधु पाटील, परशराम कंग्राळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‌‌शिक्षक व विद्यार्थी यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. बेळगाव शहर विभागात सोहम हळदणकर, स्नेहा हिरोजी, अनिकेत जाधव, शिवराज गवळी, उर्वी पाटील, वैजनाथ पाटील, अनुष्का पाटील, श्रेया भातकांडे, उदय कुमार हाजगोळकर, ऐश्वर्या कंग्राळकर या शाळेच्या दहावीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

या यशामागे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट; फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा दुर्गम जंगलातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Spread the love  बेळगाव : स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत असताना, फेसबुक फ्रेंड्स सर्कलने मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *