Sunday , August 16 2026
Breaking News

येळ्ळूरमध्ये लम्पी रोगामुळे बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील शेतकरी मारुती मोन्नप्पा मजुकर यांच्या बैलाचा लम्पी रोगामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लम्पी रोगाची लागण झाल्यानंतर संबंधित बैलाची प्रकृती खालावली होती. पशुवैद्यकीय उपचार सुरू असतानाही बैलाचा मृत्यू झाला. शेतीच्या कामांसाठी आणि उपजीविकेसाठी महत्त्वाचा असलेला बैल गमावल्याने मजुकर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या घटनेची दखल घेऊन पंचनामा करण्याची तसेच शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गावात विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, परिसरातील पशुपालकांना जनावरांची नियमित तपासणी करून लम्पी रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *