Sunday , August 16 2026
Breaking News

अबकारी आयुक्तांच्या निवासस्थानी १३.३ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या छापेमारीत तब्बल १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात ५.५ कोटी रुपये रोख रक्कम, ७.८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३.३ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. याशिवाय आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे, कॅश बुक आणि मालमत्तेच्या नोंदीही अधिकाऱ्यांच्या हाती लागल्या आहेत.

जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल छाननी सुरू असून, त्यातून आणखी आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आला असून संबंधित व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे.

ईडीच्या या धडक कारवाईमुळे बेळगावसह राज्यभरात चर्चेला उधाण आले असून, पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *