Thursday , June 25 2026
Breaking News

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शालेय निबंध स्पर्धां 2025 चा यशस्वी विद्यार्थ्याचा बक्षिसे वितरण सोहळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : बृहन्महाराष्ट्र मंडळ (नवी दिल्ली), राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेचं सलग्न संस्था मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव यांच्या सहयोगाने मराठी भाषा निबंध स्पर्धा 2025-26 शाळावार दहा शाळांचे यश संपादन केलेल्या प्रत्येकी तीन विद्यार्थी व मराठी विषय शिक्षक, तसेच मुख्याध्यापक यांचा आजच्या योग-दिनाचे औचित्य साधून रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमाचे बेळगाव शहर विभागातून 4 पाठशाळा 1) मराठा मंडळ हायस्कूल, 2) जिजामाता हायस्कूल, 3) सेंट्रल हायस्कूल, 4) महिला विद्यालय मराठी पाठशाळा

तसेचं टिळकवाडी विभागातून 5) ठळकवाडी हायस्कूल व 6) बालिका आदर्श ह्या दोन शाळांचे संयुक्तरित्या आयोजन होते.

येळ्ळूर विभागातून 4 पाठशाळा

7) महाराष्ट्र हायस्कूल,  8) चांगळेश्वरी हायस्कूल, 9) छ.शिवाजी हायस्कूल, 10) भावकेश्वरी हायस्कूल

या कार्यक्रमांस बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे श्री नितीन कपिलेश्वरकर, सह-कोषाध्यक्ष परशराम माळी, विभागीय कार्यवाह निबंध केन्द्र प्रमुख प्रभाकर हलगेकर, बापूसाहेब देसाई, कुमार पाटील, शिवराज पाटील व विलास पेडणेकर तसेचं दहाही शाळांचे संस्था प्रतिनिधी, मराठी निबंध प्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

बेळगाव व टिळकवाडी येथे सह-कोषाध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर यानी तर येळ्ळूर येथे बेळगाव संस्था अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली व मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव यांच्या कार्याचा उद्देश याची सविस्तर माहिती दिली.यानंतर विद्यार्थ्याना प्रमाणपत्रे व रोख रक्कम बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

विना भीती आव्हानांना सामोरे जा; दिव्यांगांनी आत्मविश्वासाने जीवन घडवावे : आमदार आसिफ सेठ

Spread the love  बेळगाव : दिव्यांग व्यक्तींमध्ये विशेष शक्ती असते. त्यामुळे कोणत्याही कारणाने घाबरून न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *