Sunday , June 28 2026
Breaking News

सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा. उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

Spread the love

 

 

पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली खा.उदयनराजे भोसले व आम. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट

बेळगाव : गेल्या सत्तरवर्षांपासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न तसेच सीमाभागातील मराठी माणसावर होणारे भाषिक अत्याचार, लोकशाही मार्गाने न्याय मागताना जाणूनबुजून मराठी माणसावर दाखल होणारे गुन्हे, मराठी भाषेची गळचेपी व कन्नडसक्तीचे अतिक्रमण या अनुषंगाने खानापूर बेळगाव येथून नोकरी व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेल्या युवक व नागरिकांनी पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावाने समूह तयार करून सिमावासीयांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा, केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे दाद मागण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

याच अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नी असलेल्या खटल्याला गती मिळावी म्हणून सह्यांच्या मोहिमेला पाठिंबा व्यक्त केला. सीमाप्रश्नी संसदेत व महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठवावा व लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून आज रविवार दिनांक २८ जून रोजी पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने साताऱ्याचे खासदार माननीय उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदनात सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या कर्नाटकी सरकारच्या अत्याचारसंदर्भात केंद्राने त्वरित दखल घ्यावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर प्रश्न मांडून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.

खासदार उदयनराजे यांनी निवेदनाची दखल घेऊन मला या प्रश्नाची व होणाऱ्या अन्यायाची माहिती असून या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तात्काळ पत्र लिहून सीमावासियावर होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती देणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनाही याबद्दल तात्काळ दखल घेण्यास सांगणार आहे,असे आश्वासन दिले. त्याच बरोबर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी चालू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असून यावर चर्चा घडवून आणण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या निवेदनावेळी जावळी कृषी बाजार उत्पन्न समितीचे उपाध्यक्ष श्री हेमंत हिंदुराव शिंदे, गणपती पाटील, सातेरी पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर, गंगाराम वीर, परशुराम पाखरे, राजकीरण गाडेकर, प्रशांत बावकर, युवराज रोखडे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर म. ए. समितीचा अवजड वाहतुकी विरोधात रस्ता रोको

Spread the love  वडगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक लक्काप्पा जोडट्टी यांना दिले निवेदन; रस्ते कॉन्ट्रॅक्टरला बोलावून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *