Thursday , August 20 2026
Breaking News

येळ्ळूर म. ए. समितीचा अवजड वाहतुकी विरोधात रस्ता रोको

Spread the love

 

वडगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक लक्काप्पा जोडट्टी यांना दिले निवेदन; रस्ते कॉन्ट्रॅक्टरला बोलावून दिली समज

येळ्ळूर : हालगा–मच्छे बायपास रोडच्या कामामुळे येळ्ळूर गावातून सुरू असलेली डंपर वाहतूक तात्काळ पर्यायी मार्गाने वळविण्या बरोबरच येळ्ळूर मार्गे होणारी वाळू, विटा व माती यांची वाहतूक बंद करावी, तसेच येळ्ळूर रस्त्याची डागडुजी करण्यासंदर्भात रविवारी सकाळी 11-00 वाजता येळ्ळूर वेशीत महाराष्ट्र एकीकरण समिती व येळ्ळूर ग्रामस्थ यांच्या वतीने अवजड वाहने अडवून रस्ता रोको करण्यात आला. त्यामुळे येळ्ळूरमधून होणारी वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली. वाहने एकाच ठिकाणी थांबून राहिल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. याची दखल घेत वडगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक लक्काप्पा जोडट्टी सहकाऱ्यांसह येळ्ळूरमध्ये दाखल झाले. व रस्ता रोको करणाऱ्या म. ए. समिती कार्यकर्ते व येळ्ळूर ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेतले, व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलावून घेऊन समज देत, सकाळी अकरा ते चार या वेळेत सदर रस्त्यावरून वाहतूक होणार नाही याची दखल घेऊन, बायपासचे काम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी रस्त्यावर चिखल होणार नाही याची दक्षता घेत, रस्त्यावर स्पीड ब्रेकर घालायला लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी अशोका बिल्डकॉनचे सुपरवायझर पंकज माळी हेही उपस्थित होते. त्यांनाही निवेदन देत पर्यायी मार्गाचा अवलंब करावाअसे सांगण्यात आले.. तसेच यरमाळ व येळ्ळूर रस्त्यावरून एकेरी वाहतूकही करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. डंपर वाहतूक करणाऱ्या चालकांना वाहने सावकाश चालविण्याच्या सूचनाही देण्यात याव्यात असे मत येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी यांनी मांडले. यावेळी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, उपाध्यक्ष राजू पावले, भोला पाखरे, समिती नेते दत्ता उघाडे, डी. जी. पाटील, डॉ. विवेक मेणसे, सतीश कुगजी, सुरज गोरल, दयानंद उघाडे, राकेश परीट यांनीही वाहतुकी संदर्भात सूचना मांडल्या.
निवेदन देऊन आश्वासन मिळाल्यानंतरच रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी यल्लुप्पा पाटील, गणेश अष्टेकर, अनंत कुंडेकर, हणमंत पाटील, संजय गोरल, नागेश बोबाटे, नेताजी गोरल, हणमंत बोरक, मधु पाटील, अरुण चौगुले, मारुती परीट, रामा पाखरे, पप्पू कुंडेकर, प्रकाश मालूचे, कृष्णा शहापूरकर, महादेव कुगजी, पुंडलिक घाडी, बी एन मजुकर, मधु कुगजी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *