Thursday , August 20 2026
Breaking News

येळ्ळूर येथे पल्स पोलिओ कार्यक्रमाचे उद्घाटन

Spread the love

 

येळ्ळूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत आज रविवारी सकाळी श्री चांगळेश्वरी मंदिर, येळ्ळूर येथील बुथ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्यावतीने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.

श्री चांगळेश्वरी मंदिर येथे सकाळी 8:30 वा. आयोजित या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्राम पंचायत अध्यक्ष श्री सतिश पाटील यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ.गोडसे मॅडम तसेच कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते लहान बालकांना पल्स पोलिओ डोस देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर परिसरातील 5 वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब अर्थात डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिओपासून संरक्षण मिळावे यासाठी सरकारच्यावतीने विशेष दक्षता घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी बोलताना सतीश पाटील म्हणाले की “आज संपूर्ण देशामध्ये पल्स पोलिओ दिन साजरा केला जात आहे. आपला भारत देश जरी पोलिओमुक्त झालेला असला, तरी परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून या आजाराचा अंश पुन्हा देशात येऊ नये, यासाठी भारत सरकार अत्यंत सतर्कतेने दरवर्षी ही मोहीम राबवत आहे.” या मोहिमेला तळागाळापर्यंत यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षिका आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मिळून ग्राउंड लेव्हलवर मोठे काम करत आहेत. भारत देश भविष्यातही संपूर्णपणे पोलिओमुक्त राहावा यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरिक, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. पालकांनी आपल्या ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे डोस देऊन या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *