Saturday , August 22 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 27 जून रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील शिक्षिका संज्योत बांदेकर उपस्थित होत्या. त्यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य याचा थोडक्यात आढावा श्रुतिका गुरव हिने घेतला. इयत्ता आठवी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका माया पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य भित्तीपत्रके तयार केली.

शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षकवर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *