Saturday , August 22 2026
Breaking News

जिल्हास्तरीय कबड्डी शांतिनिकेतन, संत मीरा देवेंद्र जीनगौडा शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी, स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, संत मीरा अनगोळ, देवेंद्र जिंनगौडा, शिंदोळी या शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.तसेच कराटे, बुद्धिबळ स्पर्धाही उत्साहात पार पडल्या.
शाळेच्या माधव सभागृहात या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाअध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव विद्याभारती जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते ओंकार सरस्वती भारत माता फोटो पूजन दीप प्रज्वलन करून या विविध सांघिक खेळांच्या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पोर्णिमा यानी पाहुण्यांच्या परिचय करून दिला तर सृष्टी बोंगाळे सांभवी स्वामी प्रतीक के, चंदन श्रेयस यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी लक्ष्मण पवार यांनी खेळाडूंनी शारीरिक मानसिक व संतुलित आहारसह अभ्यासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले शालेय विद्यार्थी मेघा कलखाबकर सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. या स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, संत मीरा स्कूल अनगोळ, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, संत मीरा स्कूल गणेशपुर, हनिवेल स्कूल खानापूर, गजाननराव भातकांडे स्कूल, देवेंद्र जीनगौडा स्कूल शिंदोळी या शाळेचे 400 हुन अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. याप्रसंगी क्रीडाशिक्षक उमेश मजुकर, प्रवीण पाटील, शिवकुमार सुतार, सागर कोलेकर, गंगा गानीकोप्प, श्रीकांत कांबळे, हरिष सोनार, मधु पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा मेलीनमनी तर आभार साभवी स्वामी हिने केले.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *