Saturday , August 22 2026
Breaking News

व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या शंभर टक्के निकालाबद्दल एसडीएमसीकडून शिक्षकांचा सत्कार

Spread the love

 

मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील विद्यमान व माजी एसडीएमसी सदस्यांनी आपल्या गावातील व्ही. एस. पाटील हायस्कूल, मच्छे यांना यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सदिच्छा भेट देऊन शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात शाळेच्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विषयाचे शिक्षक नाकाडे सर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मुख्याध्यापक पाटील सर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षकांच्या परिश्रमांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, निकाल कमी लागला तर त्यावर टीका करणारे अनेकजण असतात; मात्र प्रत्यक्षात उत्तम निकाल लागल्यानंतर शाळेत जाऊन शिक्षकांचे अभिनंदन करणारे आणि त्यांचे मनोबल वाढविणारे फार कमी असतात. अशा वेळी सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेच्या एसडीएमसी सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केलेला हा सन्मान प्रेरणादायी असून, त्यांनी एसडीएमसी सदस्यांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमास शिक्षक, एसडीएमसी सदस्य व मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या शंभर टक्के निकालाबद्दल शिक्षकवृंदांचे कौतुक करण्यात आले तसेच भविष्यातही अशीच उज्ज्वल परंपरा कायम राहावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

About Belgaum Varta

Check Also

तिलारीचे पाणी राकसकोपमध्ये आणण्याबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहराला तिलारी धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर शनिवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *