Tuesday , August 25 2026
Breaking News

वारा-पावसामुळे कोसळलेल्या झाडांची महापालिकेकडून तातडीने दखल; वाहतूक पूर्ववत

Spread the love

 

बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेळगाव शहरातील विविध भागांत अनेक झाडे रस्त्यावर कोसळली. शुक्रवारी कुमारस्वामी लेआऊटसह शहरातील अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेचे पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे अल्पावधीत हटवून वाहतूक सुरळीत केली.

महापालिकेच्या त्वरित कारवाईमुळे संभाव्य अपघात टळले असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

दरम्यान, पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांनी नागरिकांना वादळी वारे आणि पावसाच्या काळात विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. धोका निर्माण करणाऱ्या किंवा पडण्याची शक्यता असलेल्या झाडांपासून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच अशा घटनांची माहिती तातडीने महानगरपालिकेला द्यावी, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल सर्वप्रथम

Spread the love  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवारी झालेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *