

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमरडी येथील हुणसीकोळ मठाचे श्री शिद्धबसव स्वामीजी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मठालगत राहणाऱ्या मेदार कुटुंबीयांनी स्वामीजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद मेदार, रत्ना मेदार, मंजुनाथ, प्रवीण मेदार यांच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मठाच्या परिसरात मेदार कुटुंबीयांनी कार उभी केली होती. रात्री कार बाहेर काढताना मठाचे प्रवेशद्वार उघडण्याच्या कारणावरून मठातील सेवक आणि संबंधितांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन स्वामीजींसोबतही शाब्दिक बाचाबाची झाली.
त्यानंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली असून स्वामीजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यमकनमर्डी पोलिस करत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta