Monday , September 21 2026
Breaking News

व्याजाच्या रकमेसाठी जीवे मारण्याची धमकी, दोघे जेरबंद

Spread the love

 

बेळगाव : बेकायदेशीररीत्या व्याजाचा धंदा करून कर्जदाराकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा आरोपींना रायबाग पोलिसांनी रविवारी अटक केली.

रोहिदास गल्ली येथील विठ्ठल तुकाराम माने यांनी आरोपींकडून ३.१० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आतापर्यंत तब्बल १८.६० लाख रुपये व्याजापोटी भरूनही आरोपी आणखी पैशांची मागणी करत धमक्या देत मानसिक छळ करीत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आदित्य अशोक भोसले आणि अभिषेक अशोक भोसले या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *