

निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारतर्फे बोरगाव येथे उभारण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनचे काम पूर्ण होऊनही अद्याप कॅन्टीन सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून उद्घाटनाच्या श्रेयवादामुळेच कॅन्टीनच्या प्रारंभाला विलंब होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुमारे ८५ लाख खर्च करून इंदिरा कॅन्टीन उभारण्यात आले आहे. यामध्ये किचन, डायनिंग, महिला व पुरुष शौचालय, शुद्ध पाणी घटक, उभारण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत ५ रूपयामध्ये नाश्ता आणि १० रुपयामध्ये पोटभर जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
सकाळी ८.०० ते १०.००: नाश्ता, दुपारी १२.३० ते ३.००: जेवण, शिवाय सायंकाळी ७.३० ते ९.३०: रात्रीचे जेवण मिळणार आहे. मात्र कॅन्टीन अद्याप सुरू न झाल्यानेआणि गरजू नागरिकांना मिळू शकलेला नाही. कॅन्टीन तातडीने सुरू करून जनतेला सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नगरपंचायत कार्यालय शेजारी असलेले हे इंदिरा कॅन्टीन तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
——————————————————————-
‘बोरगाव मधील इंदिरा कॅन्टीनचे काम पूर्णत्वास आले आहे. किरकोळ कामे शिल्लक असून तात्काळ या क्रांतीचे उद्घाटन करावे याबाबतचे पत्र संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले आहे.’
–स्वानंद तोडकर,मुख्याधिकारी, बोरगाव नगरपंचायत

Belgaum Varta Belgaum Varta