Monday , September 21 2026
Breaking News

26 व्या वर्षीही अखंड अमरनाथ यात्रेला प्रारंभ; कपिलेश्वर मंदिराच्या वतीने यात्रेकरूंचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : मागील 26 वर्षांची अखंड परंपरा जपत यंदाही बेळगाव शहरातून अमरनाथ यात्रेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सोमनाथ हलगेकर आणि अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरनाथ यात्रेसह बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री तसेच पंचकेदार यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

यावर्षीही गतवर्षीप्रमाणे कपिलेश्वर मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने या पवित्र यात्रेत सहभागी झाले आहेत. यात्रेला रवाना होण्यापूर्वी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने सर्व यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला. मंदिराच्या वतीने प्रत्येक यात्रेकरूस भगवे उपरणे भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात यात्रेकरूंना सुरक्षित, यशस्वी आणि मंगलमय यात्रेसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

या प्रसंगी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे अभिजीत चव्हाण, प्रसाद बाचुळकर, नागराज कट्टी, महेश सांबरेकर, रणजीत जाधव, राघवेंद्र उरणकर, विनायक मनुगतकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या यात्रेमुळे बेळगावातील भाविकांमध्ये विशेष उत्साह असून, हिमालयातील पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी यंदाही मोठ्या श्रद्धेने यात्रेकरू रवाना झाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *