Sunday , September 20 2026
Breaking News

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ९ जुलैला बेळगाव दौऱ्यावर; विकासकामांचा घेणार आढावा

Spread the love

 

सुवर्ण विधानसौधात उच्चस्तरीय बैठक; विविध खात्यांच्या प्रगतीचे करणार परीक्षण, अधिकाऱ्यांना देणार महत्त्वाचे निर्देश

बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे गुरुवार, ९ जुलै रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून, बेळगाव प्रादेशिक विभागस्तरीय विविध शासकीय खात्यांच्या कामकाजाचा आणि विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेणार आहेत. सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचे परीक्षण करून विकासकामांना अधिक गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात येणार आहेत.

अधिकृत दौरा कार्यक्रमानुसार, गुरुवारी सकाळी १०.१० वाजता मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे विशेष विमानाने बेंगळुरूहून सांबरा विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते रस्तेमार्गे सुवर्ण विधानसौधाकडे रवाना होतील. सकाळी १०.३० वाजता सुवर्ण विधानसौध येथे विभागीय अधिकाऱ्यांसमवेत प्रगती आढावा बैठक होणार आहे.

या बैठकीत विविध विभागांच्या विकासकामांचा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, प्रलंबित कामांचा आणि नागरिकाभिमुख सेवांच्या कार्यक्षमतेचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले जाणार आहेत.

आढावा बैठक संपल्यानंतर दुपारी ३.२० वाजता मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे विशेष विमानाने बेंगळुरूकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या बेळगाव दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी बी. एम. श्रीधर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *