Sunday , September 20 2026
Breaking News

मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व निपाणी मधील शाळांना उद्या सुट्टी

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व निपाणी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (बारावीपर्यंतच्या) महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचणे, रस्ते बाधित होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *