Monday , September 21 2026
Breaking News

बिजगर्णी शिक्षण संस्थेतर्फे देणगीदारांचा सन्मान

Spread the love

 

बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण संस्था व हायस्कूलतर्फे शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस एम जाधव उपस्थित होते.
यावेळी गावचे सुपुत्र योगेश निलजकर अमेरिका यांनी सायकली व गणवेश दरवर्षी प्रमाणे यंदाही दिले, एस एम जाधव यांनी इमारतीला रंगकाम व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले. गावातील प्रा. पुंडलिक एस कांबळे शिक्षणाधिकारी बागलकोट यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, तसेच व्यापारी निंगापा बर्डे यांनी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, महात्मा गांधी संस्थेचे अध्यक्ष वाय पी नाईक यांनी वाॅटर फिल्टरची सोय करून दिली, पुंडलिक कोळी यांनी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य दिले. शाळेला रोटरी क्लबकडून पंचवीस बेंच, बूंद फाऊंडेशनकडून स्वच्छतागृह बांधून दिले.
शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला.अशाप्रकारे गावातील शिक्षण संस्थेचा उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख उंचावत आहे.समाजातील दानशूर व्यक्ती स्वयंप्रेरणेने भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढे येत आहेत. या‌आनंदाप्रित्यर्थ देणगी दारांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *