Sunday , September 20 2026
Breaking News

ध्येय निश्चित करा व त्यावर ठाम रहा यश आपलेच : डॉ.उमेश कळेकर

Spread the love

 

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात 

बेळगाव : शिक्षण घेऊन यंत्रवत जगण्यापेक्षा मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्याकडे प्रयत्न करा त्यासाठी ध्येय निश्चित करा व त्यावर ठाम रहा यश आपलेच आहे, असे प्रतिपादन डॉ. उमेश कळेकर यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते तर व्यासपीठावर गोव्याचे माजी आमदार नरेश सावळ, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, देणगीदार विजय कंग्राळकर, महेश हलगेकर, उमेश पाटील, दीपक किल्लेकर व खजिनदार के.एल. मजूकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कळेकर पुढे म्हणाले, आई वडील त्या क्षेत्रात आहेत म्हणून ते क्षेत्र न निवडता आपल्यातील सुप्त गुण ओळखून ते क्षेत्र निवडा, शरीर, मन व वाचा जागृत ठेवली तरच जीवनची दिशा ठरेल, बुद्धीमता श्रेष्ठ असली तरी मनावर नियंत्रण महत्वाचे आहे असे विचार त्यांनी मांडले.

यावेळी माजी आमदार श्री. सावळ बोलताना म्हणाले , राजहंस पक्षांप्रमाणे चांगले वाईट ओळखण्याची क्षमता बाळगण्याबरोबरच नावलौकिकासाठी चांगला माणूस बना. सोशल माध्यम अथवा मोबाईल हे दुधारी शस्त्र असले तरी त्याचा चांगला वापर व्हावा यासाठी पालकांनीही लक्ष ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे असे विचार त्यांनी मांडले.
दहावीतील साईशा देसाई, मुग्धा गोडसे, स्नेहा हिरोजी, प्राजक्ता चौगुले, साईश देसाई, अनिकेत जाधव, पल्लवी पाटील, वैभवी कुगजी, प्रणिती संभाजी, उर्वी वांगीकर व बारावीतील तनिष्का नावगेकर, रिया राऊत, साक्षी देसाई, श्रद्धा ढवळे, विनीत मोटरे, समृद्धी पाटील, साईराज पाटील, तनिष्का लगाडे, विनंती रेडेकर व समिक्षा मनगुतकर तसेच दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम आलेली दिव्या देसाई, 99.33 टक्के गुण मिळवून राज्यात पाचवी आलेली अनुष्का देसाई व 98.72 टक्के गुण मिळवून मराठी माध्यमात राज्यात प्रथम आलेल्या जान्हवी पाटील या खानापूर तालुक्यातील विद्यार्थीनीचा खास सन्मान करण्यात आला.
यावेळी 90 टक्क्यांहून जास्त गुण मिळविलेल्या 217 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
छ.शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन नरेश सावळ यांनी तर म.
जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरीचे पूजन डॉ. कळेकर यांनी केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली तर सुत्रसंचालन खजिनदार के. एल. मजूकर यांनी केले. सहचिटणीस संग्राम गोडसे यांनी स्वागत केले तर ईश्वर लगाडे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू पावले, प्रकाश गडकरी, कविता देसाई, दत्तात्रय जाधव, सुरेन्द्र जाधव, विनोद आंबेवाडकर, प्रदीप चव्हाण, शेखर पाटील, सुहास हुद्दार, उमेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पालक, विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *