Sunday , September 20 2026
Breaking News

संग्गोळी रायण्णा पुतळा धनगर समाजासाठी प्रेरणादायी

Spread the love

 

बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; पुतळा भूमिपूजन कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सर्कलचे सुशोभीकरण करून तेथे पूर्णाकृती पुतळा बसण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्कलच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ३.२५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यातून अक्कोल क्रॉसवर चबुतऱ्यावर पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पूर्णाकृती पुतळा युवकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केला. रविवारी सायंकाळी (ता.१२) आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी पालकमंत्री सतीश जारकीहोळी व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर स्मारक समितीतर्फे जारकीहोळी घोंगडे देऊन सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संग्गोळी रायण्णा यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे येथील अक्कोळ क्रॉस, अक्कोळ बाळूमामा क्रॉस आणि बोरगाव येथे सर्कलचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सध्या येथील सर्कलच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कामास प्रारंभ होणार आहे. सर्व जाती धर्मातील नागरिकांना रायण्णा यांची प्रेरणा मिळावी, यासाठी बेळगाव जिल्ह्यात सर्वात आकर्षक आणि उंच पुतळ्याचे अनावर होणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, राज्य महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील, महादेव कौलापुरे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, राजेंद्र वड्डर, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, प्रसन्नकुमार गुजर, सुजय पाटील, आर. के. धनगर, महादेव कौलापुरे, चंद्रकांत जासूद, विजय शेटके, विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई- सरकार, माजी सभापती डॉ. जसराज गिरे, राजेंद्र चव्हाण, किरण कोकरे, अल्लाबक्ष बागवान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *