Sunday , September 20 2026
Breaking News

शिंदोळी परिसरात हातभट्टी दारू विक्रीवर मारिहाळ पोलिसांचा छापा; २० लिटर दारू जप्त

Spread the love

 

बेळगाव : मारिहाळ पोलिसांनी शिंदोळी परिसरात हातभट्टी दारूच्या अवैध विक्रीवर धडक कारवाई करत सुमारे २० लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

११ जुलै रोजी होळेप्पा लक्ष्मण पुजारी (वय ४०, रा. मुतगा रोड, बेळगाव) हा शिंदोळी-मुतगा मार्गावरील शेताकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभारलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची माहिती मारिहाळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एएसआय एम. एस. रुद्रापूर व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीकडून चार पांढऱ्या कॅनमध्ये साठवलेली सुमारे २० लिटर हातभट्टी दारू जप्त केली.

या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ९९/२०२६ दाखल करण्यात आला असून कर्नाटक अबकारी कायदा कलम ३२ व ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

या यशस्वी कारवाईबद्दल मारिहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय, एएसआय आणि सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *