Sunday , September 20 2026
Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणासाठी १ कोटी निधीच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शासकीय विश्राम धामात सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन जत्राटवेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाच्या विकासासाठी १ कोटी निधी मंजूर करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. त्यावर जारकीहोळी यांनी सकारात्मक ग्वाही दिल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
निवेदनातील माहिती अशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण हे जत्राटवेस व परिसरातील शेकडो युवकांचे एकमेव क्रीडास्थळ आहे. सध्या तेथे कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. मैदानाचे सपाटीकरण, संरक्षक भिंत प्रेक्षक गॅलरी, हायमास्ट दिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, धावपट्टी तसेच इतर क्रीडा सुविधा उभारण्यासाठी १ कोटींचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
जत्राटवेस भागातून पानंद रस्त्यामार्गे अक्कोळकडे जाणारा प्रमुख रस्ता खराब झाला असून या मार्गावरून नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहन चालकांची वर्दळ आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे निपाणी ब्लॉक युवक काँग्रेस उपाध्यक्ष लोकेश घस्ते यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *