Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात मायलेकाची आत्महत्या; सासरच्या छळाचा नातेवाईकांचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात २८ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या चिमुकल्या मुलासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालय (बिम्स) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमा तळवार (वय २८) यांनी आपल्या मुलासह आत्महत्या केली. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी बिम्स रुग्णालयात धाव घेतली. यावेळी संतप्त नातेवाईकांनी मृत महिलेच्या सासूला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मृत महिलेची आई फकीरव्वा पावडी यांनी आरोप केला की, सासरच्या मंडळींनी प्रेमाच्या नावावर विविध बँका व वित्तीय संस्थांतून अनेक कर्जे काढली होती. तसेच आणखी १० लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तिचे दागिने काढून घेणे, उपाशी ठेवणे अशा प्रकारची अमानुष वागणूकही दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मृत महिलेचा भाऊ नागेश याने सांगितले की, रविवारी दुपारी घरात कोणी नसताना ही घटना घडली. जुन्या कर्जाच्या ओझ्यासह तम्मण्णी नावाचा व्यक्ती पैशांसाठी वारंवार घरी येऊन धमकावत होता. या सततच्या मानसिक तणावामुळेच प्रेमा आणि तिच्या मुलाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा दावा त्याने केला.

या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आत्महत्येमागील नेमके कारण, कथित कौटुंबिक छळ आणि आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करत आहेत. नातेवाईकांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *