Sunday , September 20 2026
Breaking News

तारांगणच्या नादब्रह्म भजन सोहळ्याचे रविवारी आयोजन

Spread the love

 

बेळगाव : तारांगण परिवार, जननी ट्रस्ट बेळगाव आणि विजय भागवत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नादब्रह्म भजन सोहळा’ रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता सरस्वती वाचनालयाचे डॉ. शकुंतला गिजरे सभागृह, कोरे गल्ली, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या भजन सोहळ्यात क्रांती महिला भजनी मंडळ, संभाजी रोड, माऊली महिला भजनी मंडळ, शास्त्रीनगर, सद्गुरु महिला भजनी मंडळ, भाग्यनगर, विश्वकर्मा महिला भजनी मंडळ, एस.पी.एम. रोड, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला भजनी मंडळ, आंबेवाडी, मुक्ताई महिला भजनी मंडळ, पिरणवाडी, अन्नपूर्णेश्वरी महिला भजनी मंडळ, खासबाग, सत्यनारायण नाद सुधा सिंगिंग स्कूल, रघुनंदन महिला भजनी मंडळ, चन्नमा नगर तसेच श्रीदत्त महिला भजनी मंडळ, गणेशपुर सहभागी होऊन भक्तिमय भजनांचा सुरेल आविष्कार सादर करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दत्तप्रसाद गिजरे, प्रा. स्वरूपा इनामदार, श्री. विजय भागवत आणि श्री. एन. एम. सत्यनारायण उपस्थित राहणार आहेत.
भक्ती, अध्यात्म आणि संगीताचा सुंदर संगम असलेल्या या नादब्रह्म भजन सोहळ्यास रसिक, वारकरी, भजनप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *