Sunday , September 20 2026
Breaking News

कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत अभंग गायन स्पर्धा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव आणि संतांचे संस्कार रुजवणे, गायन कलेला प्रोत्साहन देणे,मराठी भाषा व साहित्याची गोडी निर्माण करणे,आत्मविश्वास वाढवणे तसेच आपला सांस्कृतिक वारसा जपणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीतील सुमारे 40 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई,एकनाथ अशा विविध संतांचे अभंग विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने सादर केले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी “माऊली माऊली” या गीतावर सुंदर नृत्याविष्कार सादर केला.
एकादशीनिमित्त काही विद्यार्थी विठ्ठल-रखुमाई आणि वारकऱ्यांच्या वेशात उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तीमय आणि आनंदी झाले होते.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिक्षक तुषार कांबळे व नीता गुंजीकर यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांची वेशभूषा मनीषा वड्डगोळ व रेणुका बागडी यांनी केली तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी कुरणे यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. बी. एस. बिर्जे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उदय पाटील व राहुल कांबळे, श्रीकांत काटकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *