Monday , August 17 2026
Breaking News

हास्य व विडंबन कवितांची रंगली सुरेल मैफिल….

Spread the love

 

बेळगाव : मंथन कल्चरल अंड सोशल वेल्फेअर सोसायटी व राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य तरंग हा स्वरचित हास्य कविता व विडंबन कवितांचा कार्यक्रम वरेरकर नाट्यसंघात शनिवारी ता. ८ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. व्यासपीठावर मंथनच्या अध्यक्षा प्रिया कवठेकर तसेच प्रमुख वक्ते प्रा. अशोक अलगोंडी, कोषाध्यक्ष पूजा इजारे व सहसचिव सिद्धी सुंठणकर होत्या.
चंद्रज्योती देसाई यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रिया कवठेकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सुचित्रा बोंद्रे यांनी प्रा. अशोक आलगोंडी यांचा परिचय करून दिला. प्रा. अशोक अलगोंडी यांचा सन्मान केल्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
सोहम बोंद्रे, सानवी राजगोळकर, तेजस कदम, दिव्या कुलकर्णी, हर्ष माने, प्रिया देशपांडे,, नेहा आळतेकर, चंद्रमौळी सामंत आणि आशिष बापट. प्रा. आलगोंडी सरांनी विनोदाचे विविध प्रकार, त्यांच्या जीवनातील महत्त्व आणि विनोदातील वास्तववादीपणा स्पष्ट केला.
वात्रटपणा, बिभत्सपणा व अश्लीलता टाळून विनोद सादर करण्याची गरज त्यांनी सांगितली.
सुंठणकर, चि. वि. जोशी, राम गणेश गडकरी, इंद्रजीत घुले, विडंबनकार आचार्य अत्रे संदर्भ देत त्यांनी विनोदाची विविध रूपे उलगडली. नळावरचे युद्ध या कवितेने उपस्थितांना हसवले. यानंतर
चंद्रशेखर गायकवाड – श्रावण महिना
जतीन कमते – शिक्षा का मजाक, सतीश अनखिंडी- मी मराठी मी मराठी, नेहा जोशी, मोबाईलचा सहवास, भरत गावडे- उखाणा, सीमा कणबरकर – पारावरच्या गोष्टी, प्रा. महादेव खोत – चला व्हिडिओ कॉलिंग करू, गुरुनाथ किरमटे – नाच रे नेत्या तुझ्याच पक्षात, गौरी धामणेकर – नाच ग घुमा, बसवंत शहापूरकर – आता तरी पोरी त्याला भेटतील का, सुधाकर गावडे- पेग- पोएम आणि आय, निर्मला कळीमनी – लहरी वरूण राजा, सुनील गावडे – पिऊन जरा जास्त आहे, संजीवनी खंडागळे- अरे देवा, शुभदा खानोलकर – मनोव्यथा शेतकरी मुलाची, यशोधरा सौंदलगे कर- सुख माझं दुखतंय, डॉ. मनीषा नाडगोडा – पन्नाशी उलटता, मनीषा मोरे – जुगलबंदी, शोभा लोकुर – जावयाची कैफियत, राधिका नवलगुंद – तो एक केस, स्नेहल बर्डे – बाबांनी केली माझ्या लग्नाची घाई, किरण पाटील- बाळ मोठं होतं तेव्हा, विजया कवठेकर – गुंडू आणि बंडू, रोशनी हुंदरे- कसंतरी होतंय मला, चिन्मय शेंडे – मित्रा बंद केलास बार का, सुषमा जगजंपी – असे आमचे नवरे, स्मिता किल्लेकर – काय बाई सांगू, अस्मिता आळतेकर यांनी पैठणीची घडी.सर्वांनी अशा हास्य कविता व विडंबन कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा बापट यांनी केले. दीपा कुलकर्णी यानी कवितांचे नियोजन केले. श्रुती परांजपे यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *