
श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणी तालुका उपाध्यक्ष दिपक खापे यांचा सवाल
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती संभाजी महाराज घरात मंजुर झालेले सार्वजनिक शौचालय आणि इतर काम अर्धवट ठेवुन स्थानिक नागरीकांना त्रास होत आहे. वर्षा पुर्वी धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगर निपाणी येथील मंजुर करण्यात आलेले सार्वजनिक शौचालय मंजुर होवुनही काम होत नसल्याने श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणी तालुका उपाध्यक्ष दिपक खापे व स्थानिक नागरीकांतर्फे लोक प्रतिनीधींना निवेदन देवुन चालु करण्यास भाग पाडण्यात आले होते, पण धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगर निपाणी येथील मंजुर झालेले सार्वजनिक शौचालय पालीका प्रशासनाने फक्त खोदकाम चालु केल्याचा बहाना दाखवल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत नागरिकांनी दिलेली माहिती अशी, असलेल्या शौचालयासमोरच गेल्या 2 महीन्याप पूर्वी खड्डा काढून काडुन तसाच ठेवल्यामुळे वयोवृद्ध नागरीकांना शौचालयास जाणे मुश्किल झाले आहे, खड्ड्यामध्ये पाणी साचुन दुर्गंधी व डासाचा प्रदुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यु किंव्हा इतर आजार होण्याची संभवना होत आहे,
शौचालया समोरच भला मोठा खड्डा काढल्याने काडल्याने भिंतीही पुर्ण खचल्या असून भिंत पडण्याची भिती निर्माण झाली आहे,
नगरपालिका पालीका प्रशासनाने शौचालयाचे काम चालु करूण लवकरात लवकर पुर्ण करावे,
अन्यथा निपाणी पालीकेच्या समोर स्थानिक नागरीकांना घेवुन सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी उपोषण करू असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणी तालुका उपाध्यक्ष दिपक खापे यांनी दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta