Monday , August 17 2026
Breaking News

स्तवनिधी येथील पी. जी. विद्यामंदिर, ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये पहिली पालक सभा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित स्थवनिधी येथील पी. जी. विद्यामंदिर व ए. एस. पाटील हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2026–27 मधील पहिली पालक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी शीतल चेंडके, प्रकाश माने व अनिल कोथळे उपस्थित होते. पी जी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक बी. बी. दादननान्नवर यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भरतेश विद्यालय, बेल्लद बागेवाडी येथे सचिवपदी निवड झाल्याबद्दल महावीर पाटील यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच सन २०२६-२७ सालातील एस.एस.एल.सी. परीक्षेत कन्नड व हिंदी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्द आर. जी. सौंदलगी व डी. जे. चौगुले यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. आर. जी. सौंदलगी यांनी शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक मार्गदर्शनाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ यांनी, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एस.एस.एल.सी. परीक्षेत शाळेने निपाणी तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल त्यांनी संस्थेचे संचालक, शिक्षक व सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. याशिवाय शाळेत राबविण्यात येणारे एन.एम.एम.एस. मार्गदर्शन वर्ग, आर्मी प्रशिक्षण, नृत्य, गायन, संस्कृत, संगणक प्रशिक्षण, विद्यार्थी आरोग्य विमा, स्मार्ट बोर्डद्वारे अध्यापन आदी विविध उपक्रमांची माहिती दिली.
पालक प्रतिनिधी शीतल चेंडके व राजू तोपुगोळ यांनी, शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेली वाढ, गुरुकुल आश्रमातील सुविधा तसेच शिक्षकांचे समर्पित कार्य यांचे कौतुक करून सर्व शिक्षकांचे आभार मानले.
महावीर पाटील यांनी पालकांना विद्यार्थ्यांवर अनावश्यक शैक्षणिक दबाव न टाकता त्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधणे, त्यांच्यामध्ये सहनशीलता, उत्तम आरोग्य आणि आनंदी वृत्ती विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
बी. एस. स्वामी त्यांनी सूत्रसंचालन केले.एस. बी. मगदूम यांनी आभार मानले. पालक सभेस मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *