Sunday , August 16 2026
Breaking News

अफूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस सीसीबीकडून अटक

Spread the love

 

बेळगाव : विक्रीच्या उद्देशाने अफूजन्य अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या ६२ वर्षीय आरोपीला बेळगाव सीसीबी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे २ किलो ९८८ ग्रॅम अफूजन्य पदार्थ, अंदाजे ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१३ ऑगस्ट) सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने फोर्ट रोडवरील केएसआरटीसी डेपो परिसरातील इंदिरा कॅन्टीनजवळ कारवाई केली. यावेळी रफीकअहमद हुसेनसाब सिक्कलगार (६२, रा. अक्कतंगेरहाळ, नेसरगी रोड, ता. गोकाक) याला ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून अफूच्या झाडाच्या गसगसेच्या शेंगांचे तुकडे व पावडर असा सुमारे २ किलो ९८८ ग्रॅम मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने हा अमली पदार्थ राजस्थानमधील जोरले येथील धीरुभाई याच्याकडून आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९०/२०२६, एनडीपीएस कायद्याच्या कलम १५(बी) व ८(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईबद्दल सीसीबी विभागातील पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सरस्वती विद्या मंदिर किणये शाळेत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्यदिन संपन्न

Spread the love  बेळगाव : येथील ‘सरस्वती विद्या मंदिर, किणये शाळेत’ भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *