Sunday , August 23 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिक सोसायटीतर्फे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी उपाध्यक्ष के. एल. मजूकर, सहकार्यवाह शिवराज पाटील आणि रविंद्रनाथ जुवळी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक माधव कुटे यांनी राम गणेश गडकरी यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. गडकरी यांची नाटके गंभीर स्वरूपाची असली, तरी त्यांचे स्फुट लेखन विनोदी होते. त्यांची भाषा अतिशय सुंदर आणि प्रभावी होती, असे त्यांनी सांगितले.

स्वाती मोरे यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर डॉ. श्रेयस चौगुले, नारायण कोरडे, पी. एन. रायबागी, रविंद्रनाथ जुवळी, अश्विनी पाटील, विजयमाला पाटील, विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे आणि अशोक लोकूर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

मीना कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच विजयसिंह देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

के. एल. मजूकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

रेनाॅटस् वेलनेसच्या आरोग्य शिबीरास मोठा प्रतिसाद

Spread the love  बेळगांव : स्कायहायच्या सौजन्याने येथील रेनॉटस् वेलनेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *