
बेळगाव : नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करत बेळगाव शहरातील मार्केट पोलिसांनी तब्बल १२३ मोबाईल फोन शोधून काढले आहेत.
मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी १ जानेवारी ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधमोहीम राबविली.
या कारवाईत विविध कंपन्यांचे एकूण १२३ मोबाईल शोधण्यात आले. त्यापैकी ७९ मोबाईल यापूर्वीच संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले, तर उर्वरित ४४ मोबाईल २२ ऑगस्ट रोजी त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
ही कारवाई मार्केट पोलीस ठाण्याचे पीआय जे. एम. कालिवर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यल्लप्पा काकनूर आणि विनायक यलिगार यांनी केली.
हरवलेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत मिळवून देण्यात यश आल्याबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta