Wednesday , August 26 2026
Breaking News

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा शाळेला क्रीडा साहित्य भेट

Spread the love

 

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा इंग्रजी अनगोळ शाळेला क्रीडासाहित्य भेट देण्यात आले.

संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष शशिधर पाटील, सचिव मल्लिकार्जुन मुरगुडे, उमेश रामगुरवाडी, प्रसाद कट्टी, क्रीडा साहित्य पुरस्कर्ते राजेश कुमार तळेगाव, अभिनंदन हुद्दार या क्लबच्या सदस्यानी शाळेच्या खेळाडूंना प्रोत्साहन पर विविध क्रीडा साहित्य शाळेच्या उप मुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व शाळेच्या खेळाडूंचीकडे सुपूद करण्यात आली.
याप्रसंगी रोटरी क्लब वेणुग्रामचे अध्यक्ष शशिधर पाटील यांनी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच त्यांनी विविध खेड्यातील पाच शाळा दत्तक घेण्यात आल्याचे सांगितले व त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा शालेय पाठ्यपुस्तके गणवेश व त्यांच्या गरजूनुसार लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविण्यात येत आहेत तसेच आरोग्य शिबिर ही विविध समाजाच्या घटकांसाठी राबविण्यात येत आहेत याची माहिती दिली.
याप्रसंगी विना जोशी, अनुराधा पुरी व शालेय शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे नगरसेविका सारिका पाटील यांचा सत्कार

Spread the love  बेळगाव : नगरसेविका सौ. सारिका पाटील यांची बेळगांव महापालिकेच्या लेखा समितीच्या अध्यक्षस्थानी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *